मुगाचे डोसे
नाश्ता किंवा जेवण म्हणून हि खाण्यासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे …. यात जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात … वन डिश फुल मील …. असे आपण नक्की म्हणू शकतो …. लहान मुलांना डब्यात द्यायलाही छान आहे …. ब्रंच म्हणूनही करू शकता …. याबरोबर एखादे रंगीत सलाड केले तर याची पोष्टीकता जास्त वाढेल
साहित्य :
डोस्यासाठी -
२ वाटी हिरवे मुग ( ८ तास भिजवलेले )
३/४ वाटी बारीक रवा ( ८ तास भिजवलेला )
२ चमचे तांदुळाचे पीठ
आवडत असल्यास लोणी
सोडा
मीठ
चटणी :-
ओले खोबरे
मिरची
लसुण
आले
कोथिम्बिर
कढीपत्ता
मीठ
जिरे पाव चमचा
साखर चवीनुसार
कृती :
१. प्रथम हिरवे मुग व रवा ८ तास वेगवेगळे भिजत घालावेत, नंतर मुग उपसून मिक्सरमधून फिरवून घ्यावेत, त्यात भिजलेला रवा २ चमचे तांदुळाचे पीठ ,थोडे मीठ, १/२ चमचा सोडा घालावा. गरज लागल्यास पाणी घालावे , हे मिश्रण नेहमीच्या डोस्याच्या पीठाइतके पातळ होत नाही, जर घट्टसरच असते.
२. चटणीचे सर्व साहित्य मिक्सरवरून वाटून चटणी करावी, या चटणीत नेहमी पेक्षा आले जर जास्त घालावे मुगाच्या दोस्याबरोबर छान लागते.
२. तवा तापवायला ठेवावा, निट तापला आहे याची खात्री करून, थोडेसे तेल लावून डोसे घालावेत आणि पीठ पसरवावे, आवडत असल्यास वरून लोणी घालावे व गरम गरम सर्व्ह करावेत …
टीप : रवा व तांदुळाच्या पिठामुळे डोसे कुरकुरीत होतात
दोस्यावर वरून मेतकुट हि शकतो