पपईचा जाम
साहित्य:
१ मध्यम आकाराची पपई ( खूप पक्व नको, थोडी कच्ची घ्यावी, एक ते दोन दिवसात पिकेल अशी)
साखर
जायफळाची पूड
१/२ लिंबू
कृती :
१. पपई चिरून मग खिसुन घ्यावी.
२. खिसलेली पपई वतीने मोजून घ्यावी व त्याच्या ३/४ साखर घालावी म्हणजे जर पपईचा खीस दोन वाट्या झाला तर दिड वाटी साखर घालावी, त्यात अर्धा लिंबू पिळावा , जड बुडाच्या पातेल्यात शिजवायला ठेवावी. सतत हलवत राहावे अथवा खाली हे मिश्रण लागेल
३. शिजल्यावर हे मिश्रण एकत्र मिळून येऊ लागेल मग आच बंद करावी आणि त्यात आवडत असल्यास थोडी जायफळ पूड घालावी
४. पूर्ण गार झाल्यावर एका स्वच्छ आणि कोरड्या शक्यतो काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावी, हा जाम चपाती किंवा फुलाक्याबरोबर लाऊन खायला खूप छान लागतो

No comments:
Post a Comment