नाचणीची आंबील
साहित्य :
३ चमचे नाचणीचे पीठ
१ चमचा तेल/तूप
५-६ पाकळ्या लसूण
जिरे
कोथिम्बिर
पुदिना पाने
मीठ
ताक
चाट मसाला
६०० मिली पाणी
कृती :
१. पातेल्यात एक चमचा तेल/तुपावर लसुण परतावा, त्यात थोडे जिरे घालावेत.त्यात पाणी घालून उकळत ठेवावे
२. नाचणीच्या पिठात गार पाणी घालून त्याची पेस्ट करावी, गुठळ्या होऊ देऊ नयेत.
३. पाण्याला उकळी आल्यावर त्यात नाचणीची पेस्ट व मीठ घालावी, सतत हलवत राहावे गुठळ्या होऊ देऊ नयेत, २-३ मिनिटे उकळल्यानंतर आच बंद करावी , आंबील पूर्ण थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावी.
४. प्यायला घेताना ग्लासमध्ये थंड गार आंबील, त्यात थोडे ताक, वरून थोडा चाट मसाला, बारीक चिरलेला पुदिना व कोथिम्बिर घालावी.
टीप : हि आंबील उन्हाळ्यात पिल्यास उन्हाळ्याचा त्रास होत नाही, नाचणी थंड असते, लहान मुलानाही आवडते

No comments:
Post a Comment