खजुराच्या वड्या
लागणारा वेळ : ४५ मिनिट
५०० ग्राम काळे खजूर
८-१० सुके अंजीर
१/२ वाटी काजूचे तुकडे
१/२ वाटी बदामाचे तुकडे
कृती :
१. खजुराच्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावेत , सुके अंजीराचेही बारीक काप करावेत
२. कढईत खसखस भाजून बाजूला काढून घ्यावी.
३. त्याच कढईत १ चमचा तूप गरम करून त्यावर काजू व बदामाचे तुकडे भाजून घ्यावेत आणि एका ताटात काढावेत.
४. त्याच तुपावर खजूर आणि अंजीर घालून नीट परतावे, १० मिनिटात ते मऊ होईल. गेस वरून खाली काढून हे मिश्रण गरम असतानाच मिक्सर वरून फिरून घ्यावे.
५. परत कढईत १ चमचा तूप गरम करून त्यावर खजुराचा मिश्रणाचा गोल आणि काजू आणि बदामाचे काप घालून ३-४ मिनिट परतावे , सर्व नीट मिक्स करून घ्यावे.
६. पोळपाट लाटण्यावर तुपाचा हात फिरून त्यावर हा मिश्रणाचा गोळा लाटुन वड्या पाडाव्यात
७. या वड्या एका ताटात काढून १० मिनिटे फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवाव्यात.
गार झाल्यावर या वड्या खाण्यास तयार आहेत.
या वद्य १० ते १५ दिवस नीट टिकतात.
* यात हवे असल्यास सर्व प्रकारचा सुका मेवा घालू शकता.
* चांदीच्या वर्खाने सजवल्यास खूप छान दिसते आणि खास लहान मुलांसाठी केल्या तर ते खूप आवडीने खातात.


No comments:
Post a Comment